पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय ६ (२): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण ८
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(2) पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.
थोडक्यात · निष्कर्ष
पर्यटनाचे स्थानिक, आंतरराज्यीय, आंतरराष्ट्रीय, धार्मिक, ऐतिहासिक, आरोग्यपूरक, विज्ञान, कृषी, नैमित्तिक, क्रीडा पर्यटन असे ढोबळमानाने प्रकार पडतात. त्यांपैकी तीन प्रकार :
पूर्ण उकल
- टप्पा १
पर्यटनाचे स्थानिक, आंतरराज्यीय, आंतरराष्ट्रीय, धार्मिक, ऐतिहासिक, आरोग्यपूरक, विज्ञान, कृषी, नैमित्तिक, क्रीडा पर्यटन असे ढोबळमानाने प्रकार पडतात. त्यांपैकी तीन प्रकार :
- टप्पा २
- (1) ऐतिहासिक पर्यटन : संपूर्ण जगभरातील हा एक महत्त्वाचा पर्यटन प्रकार आहे. लोकांचे इतिहासाच्या संदर्भातील कुतूहल लक्षात घेऊन ऐतिहासिक पर्यटन सहलींचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक गोपाळ नीळकंठ दांडेकर दुर्गभ्रमण यात्रा आयोजित करत असत. भारतीय पातळीवर राजस्थानातील किल्ले, महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्याशी संबंधित आश्रम, १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित स्थळे अशा ऐतिहासिक ठिकाणांच्या सहली आयोजित केल्या जातात.
- (2) भौगोलिक पर्यटन : यात विविध भौगोलिक वैशिष्ट्ये निरीक्षणासाठी पर्यटन केले जाते. अभयारण्ये, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स (उत्तराखंड), समुद्रकिनारे, भौगोलिक वैशिष्ट्यपूर्ण स्थळे (उदा., लोणार सरोवर, निघोज येथील रांजणखळगे) इत्यादींचा समावेश भौगोलिक पर्यटनात होतो. यातील अनेक स्थळांमधील निसर्गाचे अवलोकन करावे या इच्छेपोटी आणि कुतूहलापोटी अनेक पर्यटक तिथे जात असतात.
- (3) आरोग्य पर्यटन : भारतातील वैद्यकीय सेवा व सुविधा पाश्चात्त्यांच्या मते स्वस्त व दर्जेदार आहेत. या कारणास्तव परदेशी लोक भारतात येऊ लागले आहेत. भारतात मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध असतो; त्याचा लाभ घेण्यासाठी कितीतरी लोक भारतात येतात. योगशिक्षण आणि आयुर्वेदिक उपचारांसाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.
- निष्कर्ष
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.