पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय ४ (२): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण ८
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(2) पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते ?
थोडक्यात · निष्कर्ष
म्हणजेच पर्यटन हे स्थानिक लोकांच्या उपजीविकेचे साधन ठरते.
पूर्ण उकल
- टप्पा १
पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो. पर्यटनामुळे अनेक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात :
- टप्पा २
- परदेशी पर्यटकाने विमानतळावर पाऊल ठेवल्याआधीपासून तो भेट देणाऱ्या देशाला उत्पन्न मिळवून देण्यास सुरुवात करतो; व्हिसा फीमुळे आपल्या देशाला महसूल मिळतो.
- प्रवासखर्च, हॉटेलमध्ये राहणे, खाणे, दुभाष्याची मदत घेणे, वर्तमानपत्रे, संदर्भ साहित्य विकत घेणे, आठवण म्हणून स्थानिक वस्तू विकत घेणे एवढ्या गोष्टी पर्यटक मायदेशी जाईपर्यंत करतो; या सर्वांतून स्थानिकांना उत्पन्न मिळते.
- पर्यटन केंद्रांच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होतो. तेथील हस्तोद्योग व कुटिरोद्योग यांचा विकास होतो. स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकौशल्याच्या वस्तू इत्यादी पर्यटक आवडीने खरेदी करतात.
- महाबळेश्वर, पाचगणीसारख्या ठिकाणी मार्गदर्शक ठिकाणांची माहिती सांगतात, फोटोग्राफर फोटो काढून देतात, घोडेवाले घोड्यावरून फेरफटका मारून आणतात, घोडागाडीत फिरवतात. ही सर्व कामे स्थानिक लोक करतात; त्यामुळे त्यांना चांगला रोजगार मिळतो.
- निष्कर्ष
म्हणजेच पर्यटन हे स्थानिक लोकांच्या उपजीविकेचे साधन ठरते.
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.