VedSquare
८. पर्यटन आणि इतिहासयादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न ३ (१)पाठ्यपुस्तक पान ५८

पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय ३ (१): उत्तर व उकल

इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण ८

प्रश्न
टीपा लिहा. (1) पर्यटनाची परंपरा

पूर्ण उकल

  1. टप्पा १
    पर्यटन
    दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणे म्हणजे पर्यटन होय.
  2. निष्कर्ष
    • आपल्या देशात पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे. तीर्थक्षेत्रांना भेट देणे, स्थानिक जत्रा-यात्रांना जाणे, विद्याभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे, व्यापारासाठी जाणे या निमित्तांनी पूर्वी पर्यटन घडून येत असे.
    • बौद्ध वाङ्मयात लोकांच्या उद्बोधनासाठी स्वतः गौतम बुद्धांनी भारतातील अनेक प्राचीन शहरांना भेटी दिल्याचे उल्लेख आहेत. बौद्ध भिक्खूंना सतत भ्रमण करत राहणे आवश्यक असे; जैन मुनी आणि साधूही सतत भ्रमण करत.
    • इ.स. ६३० मध्ये चिनी प्रवासी युआन श्वांग भारतात आला होता. मध्ययुगात संत नामदेव, संत एकनाथ, गुरू नानकदेव, रामदास स्वामी हे भारतभ्रमण करत होते.
    • तीर्थयात्रेसाठी देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पायी प्रवास करण्याची परंपरा भारतात पूर्वीपासून प्रचलित होती; विष्णुभट गोडसे यांचे ‘माझा प्रवास’ हे त्याचे उदाहरण आहे.
    • सारांश, मानवाला खूप पूर्वीपासून फिरण्याची आवड आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात थॉमस कुकमुळे आधुनिक पर्यटनयुग सुरू झाले.

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.