VedSquare
८. पर्यटन आणि इतिहासयादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न २ (२)पाठ्यपुस्तक पान ५८

पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय २ (२): उत्तर व उकल

इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण ८

प्रश्न
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (2) आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.

पूर्ण उकल

  1. निष्कर्ष
    • आपल्या देशाला प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा ऐतिहासिक स्थळांचा वारसा मिळाला आहे; त्याचबरोबर नैसर्गिक समृद्धीचा वारसाही लाभलेला आहे.
    • संपूर्ण जगात गौरवली गेलेली ताजमहाल, जंतरमंतर वेधशाळा, अजिंठा, वेरूळ, घारापुरी (एलिफंटा) लेणी, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, पश्चिम घाटातील कास पठार यांसारखी महत्त्वाची स्थळे भारतात आहेत.
    • हा वारसा पाहण्यासाठी देश-विदेशातून हजारो लोक येतात; त्यामुळे देशाला महसूल मिळतो आणि स्थानिकांना रोजगार मिळतो.
    • परंतु विद्रूपीकरण, भिंतीवर मजकूर लिहिणे, झाडांवर कोरणे, जुन्या वास्तू भडक रंगात रंगवणे, अस्वच्छता यांचा विपरीत परिणाम आपल्या देशाच्या प्रतिमेवर होतो.
    • हा वारसा एकदा नष्ट झाला तर तो पुन्हा निर्माण करता येत नाही. पुढील पिढ्यांसाठीही तो टिकावा म्हणून आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.