VedSquare
८. पर्यटन आणि इतिहासयादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न ४ (१)पाठ्यपुस्तक पान ५८

पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय ४ (१): उत्तर व उकल

इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण ८

प्रश्न
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (1) पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ?
✓
थोडक्यात · निष्कर्ष

देशी आणि परदेशी पर्यटकांचे उद्बोधन हा पर्यटन विकासातील सगळ्यांत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी पुढील काळजी घेणे आवश्यक आहे :

पूर्ण उकल

  1. टप्पा १

    देशी आणि परदेशी पर्यटकांचे उद्बोधन हा पर्यटन विकासातील सगळ्यांत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी पुढील काळजी घेणे आवश्यक आहे :

  2. निष्कर्ष
    • पर्यटकांची वाहतूक आणि सुरक्षितता, प्रवासातील सुखसोई आणि उत्तम दर्जाच्या निवासस्थानांची उपलब्धता असावी.
    • प्रवासात स्वच्छतागृहांची सोय या गोष्टींना पर्यटनामध्ये प्राधान्य द्यावे; ‘स्वच्छ भारत अभियाना’सारख्या उपक्रमांतून परिसर स्वच्छ ठेवावा.
    • दिव्यांग पर्यटकांच्या गरजांकडे विशेष लक्ष पुरवणे आवश्यक आहे.
    • जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या भाषांमध्ये माहितीपुस्तिका, मार्गदर्शिका, नकाशे, इतिहासविषयक पुस्तके उपलब्ध करून द्यावीत.
    • पर्यटकांना गाडीतून फिरवणाऱ्या वाहन चालकांना दुभाषाचे प्रशिक्षण देऊन त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम करावे.
    • ऐतिहासिक स्थळांचे विद्रूपीकरण करणे, भिंतीवर मजकूर लिहिणे, झाडांवर कोरणे, जुन्या वास्तू भडक रंगात रंगवणे, परिसरात सुविधांच्या अभावामुळे अस्वच्छता वाढणे या गोष्टी टाळाव्यात.

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.