मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय ५ (२): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण ६
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(2) पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा.
पूर्ण उकल
- टप्पा १
- पोवाडा
- पोवाडा हा एक गद्यपद्यमिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे. पोवाड्यामध्ये शूर स्त्री-पुरुषांच्या पराक्रमाचे आवेशयुक्त व स्फूर्तिदायक भाषेत कथन केले जाते.
- निष्कर्ष
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अज्ञानदास या कवीने अफझलखान वधाविषयी रचलेला आणि तुळशीदासाने रचलेला सिंहगडच्या लढाईचा पोवाडा प्रसिद्ध आहे.
- ब्रिटिशांच्या काळात उमाजी नाईक, चापेकर बंधू, महात्मा गांधी यांच्यावर पोवाडे रचले गेले.
- संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि गवाणकर या शाहिरांनी रचलेल्या पोवाड्यांनी महाराष्ट्र गाजवला आणि पोवाड्यांच्या माध्यमातून जागृती करण्यात आली.
- अशा प्रकारे पोवाडा हे मनोरंजनाबरोबरच इतिहास सांगणारे, स्फूर्ती देणारे व लोकजागृती करणारे लोकनाट्याचे प्रभावी माध्यम आहे.
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.