VedSquare
६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न २पाठ्यपुस्तक पान ४५

मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय २: उत्तर व उकल

इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण ६

प्रश्न
पुढील तक्ता पूर्ण करा. (भजन, कीर्तन, लळित, भारूड — गुणवैशिष्ट्ये व उदाहरणे)

पूर्ण उकल

  1. निष्कर्ष
    • भजन — गुणवैशिष्ट्ये : टाळ, मृदंग किंवा पखवाज इत्यादी वाद्यांच्या साथीत ईश्वरगुणवर्णनपर व नामस्मरणपर काव्यरचना गाणे. चक्री भजन (न थांबता चक्राकार फिरत भजने म्हणणे) व सोंगी भजन (देवभक्ताची भूमिका घेऊन संवादस्वरूपात भजने म्हणणे) हे दोन प्रकार. उदाहरणे : संत तुकडोजी महाराजांचे ‘खंजिरी भजन’; संत तुलसीदास, सूरदास, मीराबाई, कबीर यांची भजने.
    • कीर्तन — गुणवैशिष्ट्ये : कीर्तनकाराच्या अंगी वक्तृत्व, गायन, वादन, नृत्य, विनोद यांचे कौशल्य व बहुश्रुतता लागते; कीर्तन मंदिरात किंवा मंदिराच्या परिसरात केले जाते. नारदीय (हरिदासी) व वारकरी या दोन मुख्य परंपरा; हरिदासी कीर्तनात पूर्वरंग व उत्तररंग असतात. उदाहरणे : संत नामदेवांचे कीर्तन, वारकरी कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन (दत्तोपंत पटवर्धन), सत्यशोधकी कीर्तन, संत गाडगे महाराजांची कीर्तने.
    • लळित — गुणवैशिष्ट्ये : महाराष्ट्रातील मनोरंजनाचा एक जुना प्रकार; नारदीय कीर्तन परंपरेत समावेश; धार्मिक उत्सवप्रसंगी उत्सवदेवतेसमोर ‘ज्याला जे हवे असेल त्याला ते मिळो...’ असे मागणे; नाट्यप्रवेशाप्रमाणे सादर केले जाते; आधुनिक मराठी रंगभूमीला लळिताची पार्श्वभूमी आहे. उदाहरणे : कृष्ण व रामकथा आणि भक्तांच्या कथा सांगणारी लळिते; कोकण व गोवा भागातील लळिते; काही हिंदी भाषेतील लळिते.
    • भारूड — गुणवैशिष्ट्ये : आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपकात्मक गीत; पथनाट्याप्रमाणे प्रयोगशील; विविधता, नाट्यात्मता, विनोद व गेयता; लोकशिक्षण हा उद्देश. उदाहरणे : संत एकनाथांची भारुडे.

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.