मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय ३ (३): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण ६
टीपा लिहा.
(3) रंगभूमी व चित्रपट क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे
थोडक्यात · निष्कर्ष
रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांमध्ये इतिहासाच्या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत.
पूर्ण उकल
- टप्पा १
रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांमध्ये इतिहासाच्या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत.
- निष्कर्ष
- नाटक : (1) नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादींचे तपशील अचूक असण्यासाठी संबंधित ऐतिहासिक काळातील चित्रकला, शिल्पकला, स्थापत्य या विषयांचा सखोल अभ्यास असणाऱ्या जाणकारांना कलादिग्दर्शनाचे नियोजन करता येते किंवा त्यासाठी सल्लागार म्हणून काम करता येते. (2) संवादलेखनाच्या प्रक्रियेत लेखक आणि लेखकांचे सल्लागार म्हणून भाषा आणि संस्कृतीच्या इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते.
- चित्रपट : (1) चित्रपटांमध्ये कथेशी संबंधित काळाच्या वातावरण निर्मितीचे तसेच पात्रांच्या वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करण्याचे काम कलादिग्दर्शक करतात. या क्षेत्रातही इतिहासाच्या जाणकारांना प्रत्यक्ष कलादिग्दर्शक किंवा कलादिग्दर्शनासाठी सल्लागार म्हणून काम करता येते. (2) चित्रपटाच्या संवादलेखनासाठी भाषा व संस्कृतीच्या जाणकारांची आवश्यकता असते.
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.