मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय ३ (२): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण ६
टीपा लिहा.
(2) मराठी रंगभूमी
पूर्ण उकल
- निष्कर्ष
- ललित कला व्यक्तीने किंवा समुदायाने सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी. नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, कलावंत, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंच, नेपथ्य, प्रकाशयोजना, प्रेक्षक व समीक्षक असे अनेक घटक रंगभूमीशी संबंधित असतात.
- तंजावरच्या भोसले राजवंशाने मराठी व दाक्षिणात्य भाषांमध्ये नाटकांना उत्तेजन दिले.
- महाराष्ट्रातील रंगभूमीच्या विकासात १९व्या शतकाचे स्थान महत्त्वाचे आहे. विष्णुदास भावे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात; ‘सीतास्वयंवर’ हे त्यांनी रंगभूमीवर आणलेले पहिले नाटक होय.
- मुद्रित स्वरूपात संहिता उपलब्ध असणारे पहिले नाटक वि.ज. कीर्तने यांनी १८६१ साली लिहिलेले ‘थोरले माधवराव पेशवे’ हे होय.
- किर्लोस्कर मंडळी व नाटक कंपनीची संगीत नाटके लोकप्रिय झाली; ‘संगीत शाकुंतल’, ‘संगीत शारदा’, ‘मूकनायक’, ‘कीचकवध’, ‘संगीत मानापमान’, ‘एकच प्याला’ ही नाटके महत्त्वाची आहेत.
- पडत्या काळात आचार्य अत्रे यांच्या ‘साष्टांग नमस्कार’, ‘उद्याचा संसार’, ‘घराबाहेर’ यांसारख्या नाटकांनी रंगभूमीला सावरले; पुढे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘टिळक आणि आगरकर’ इत्यादी नव्या धर्तीची नाटके आली.
- गणपतराव जोशी, बालगंधर्व, नारायणराव राजहंस, केशवराव भोसले, चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव बोडस ही नाट्यकलावंतांची नावे अग्रक्रमाने घेतली जातात. ब्रिटिशांनी मुंबईत ‘प्ले हाऊस’, ‘रिपन’, ‘व्हिक्टोरिया’ ही नाट्यगृहे बांधल्यानंतर मराठी नाटके बंदिस्त नाट्यगृहांत होऊ लागली.
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.