VedSquare
६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न ३ (१)पाठ्यपुस्तक पान ४५

मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय ३ (१): उत्तर व उकल

इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण ६

प्रश्न
टीपा लिहा. (1) मनोरंजनाची आवश्यकता

पूर्ण उकल

  1. निष्कर्ष
    • मनाला विरंगुळा मिळवून देणाऱ्या गोष्टी म्हणजे मनोरंजनाची साधने होत. निरनिराळे छंद, खेळ, नाटक-चित्रपटादी करमणुकीची साधने, लेखन-वाचनादी सवयी इत्यादींचा अंतर्भाव मनोरंजनात होतो.
    • उत्तम प्रतीचे निखळ मनोरंजन व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी महत्त्वाचे असते.
    • चाकोरीबद्ध जगण्यातील कंटाळा दूर करून मनाला चैतन्य, ताजेपणा, शरीराला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम मनोरंजन करते.
    • छंद वा खेळांची जोपासना केल्याने व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.
    • भारतात प्राचीन व मध्ययुगीन काळात उत्सव, सण-सोहळे, खेळ, नाच-गाणे इत्यादी मनोरंजनाची साधने होती; आधुनिक काळात मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध आहेत.
    • मनोरंजनाचे कृतिशील (प्रत्यक्ष शारीरिक-मानसिक सहभाग; उदा., हस्तव्यवसाय, खेळ) आणि अकृतिशील (फक्त प्रेक्षक; उदा., खेळाचा सामना पाहणे, संगीत ऐकणे, चित्रपट पाहणे) असे दोन प्रकार आहेत.

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.