भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय ४. (३): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण १४
खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (3) राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात?
पूर्ण उकल
- निष्कर्ष
- भारतातील न्यायालये राजकीय प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसत आहेत.
- राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्याचे निर्बंध न्यायालयाने घातले आहेत.
- गुन्हेगारांना राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास बंदी असे निर्बंधही न्यायालयाने घातले आहेत.
- या प्रयत्नांमुळे राजकारणातील पैसा व गुंडगिरीचे महत्त्व कमी होऊन लोकांचा राजकीय प्रक्रियेवरील विश्वास वाढण्यास मदत होते.
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.