VedSquare
१४. भारतीय लोकशाहीसमोरील आव्हानेयादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न ४. (१)पाठ्यपुस्तक पान ९९

भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय ४. (१): उत्तर व उकल

इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण १४

प्रश्न
खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (1) भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत?
✓
थोडक्यात · निष्कर्ष

भारतात लोकशाही यशस्वी होण्यासाठी पुढील बाबी आवश्यक आहेत :

पूर्ण उकल

  1. टप्पा १

    भारतात लोकशाही यशस्वी होण्यासाठी पुढील बाबी आवश्यक आहेत :

  2. निष्कर्ष
    • बहुमताचे सरकार असले तरी अल्पमतात असणाऱ्या व अल्पसंख्य लोकांना निर्णयप्रक्रियेत सामावून घेणे आणि त्यांच्या हितसंबंधांचा विचार करणे; सर्व धार्मिक, वांशिक, भाषिक, जातीय गटांना निर्णयप्रक्रियेत समान संधी मिळणे.
    • राजकीय प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक होणे; न्यायालयांनी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला आळा घालण्यासाठी घातलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी.
    • सरकार, प्रशासन व न्यायालयांबरोबरच सामाजिक व वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे (उदा., सर्व शिक्षा अभियान, स्वच्छ भारत अभियान, स्व-मदत गट).
    • सर्वच पातळ्यांवर, विशेषतः शासनव्यवहारात, नागरिकांचा सहभाग वाढणे आणि सत्तेवर न येऊ शकलेल्यांबरोबरही संवाद व देवाण-घेवाण असणे.
    • समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा वैयक्तिक जीवनातही आदर करणे आणि जबाबदार नागरिक असल्याची जाणीव ठेवणे.

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.