VedSquare
१४. भारतीय लोकशाहीसमोरील आव्हानेयादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न ४. (२)पाठ्यपुस्तक पान ९९

भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय ४. (२): उत्तर व उकल

इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण १४

प्रश्न
खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (2) राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात?
✓
थोडक्यात · निष्कर्ष

राजकीय प्रक्रियेमध्ये गुन्हेगारांचा वाढता सहभाग ही लोकशाहीसमोरील गंभीर समस्या आहे. त्याचे पुढील परिणाम होतात :

पूर्ण उकल

  1. टप्पा १

    राजकीय प्रक्रियेमध्ये गुन्हेगारांचा वाढता सहभाग ही लोकशाहीसमोरील गंभीर समस्या आहे. त्याचे पुढील परिणाम होतात :

  2. निष्कर्ष
    • गुन्हेगारी पार्श्वभूमी, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप किंवा भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तींना काही वेळा राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जाते.
    • त्यामुळे राजकारणामध्ये पैसा आणि गुंडगिरी यांचे महत्त्व वाढते.
    • निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर होऊ शकतो.
    • प्रामाणिक व सामान्य नागरिक राजकारणापासून दूर राहतात आणि लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास कमी होतो.

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.