VedSquare
९. ऐतिहासिक ठेव्यांचे जतनयादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न ३. (२)पाठ्यपुस्तक पान ६६

ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय ३. (२): उत्तर व उकल

इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण ९

प्रश्न
टीपा लिहा. (२) विश्वकोश
✓
थोडक्यात · निष्कर्ष

मराठी विश्वकोश : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा व साहित्याच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने विश्वकोश निर्मितीस चालना दिली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली निर्मिती सुरू झाली. जगभरातील ज्ञान साररूपाने यात आणले असून इतिहासाशी निगडित महत्त्वाच्या नोंदी त्यात आहेत. तसेच श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोशा’चे तेवीस खंड आहेत.

पूर्ण उकल

  1. टप्पा १

    विश्वकोश हा कोशांचा एक प्रकार असून त्याचे दोन भाग पडतात :

  2. टप्पा २
    • सर्वसंग्राहक विश्वकोश : सर्व विषयांचे ज्ञान देणारे; उदा. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश.
    • विशिष्ट विषयपर कोश : एखाद्या विषयाला वाहून घेतलेले; उदा. भारतीय संस्कृती कोश, व्यायाम ज्ञानकोश.
  3. निष्कर्ष

    मराठी विश्वकोश : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा व साहित्याच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने विश्वकोश निर्मितीस चालना दिली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली निर्मिती सुरू झाली. जगभरातील ज्ञान साररूपाने यात आणले असून इतिहासाशी निगडित महत्त्वाच्या नोंदी त्यात आहेत. तसेच श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोशा’चे तेवीस खंड आहेत.

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.