उपयोजित इतिहास स्वाध्याय ५ (४): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण ३
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(4) नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात ?
थोडक्यात · निष्कर्ष
यामुळे वारशाचे पुढील पिढ्यांसाठी योग्य जतन होते आणि त्याचबरोबर स्थानिक लोकांना रोजगार व व्यवसायाच्या संधीही मिळतात.
पूर्ण उकल
- टप्पा १
सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पांमध्ये अनेक विषयांतील तज्ज्ञांचा सहभाग असतो. त्या सर्वांमध्ये संबंधित स्थळाच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम उपयोजित इतिहासाद्वारे करता येते. त्यामुळे पुढील गोष्टी साध्य होतात :
- टप्पा २
- (1) प्रकल्पांतर्गत वारसास्थळाचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामे करणे शक्य होते.
- (2) स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता, त्यांच्यापुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावा घेता येतो.
- (3) सांस्कृतिक वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे नियोजन करता येते.
- (4) स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सामील करून घेता येते.
- (5) स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील, अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी, यासाठी पद्धतशीर नियोजन करणे शक्य होते.
- निष्कर्ष
यामुळे वारशाचे पुढील पिढ्यांसाठी योग्य जतन होते आणि त्याचबरोबर स्थानिक लोकांना रोजगार व व्यवसायाच्या संधीही मिळतात.
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.