VedSquare
३. उपयोजित इतिहासयादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न ५ (१)पाठ्यपुस्तक पान २१

उपयोजित इतिहास स्वाध्याय ५ (१): उत्तर व उकल

इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण ३

प्रश्न
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (1) पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा. (अ) विज्ञान (ब) कला (क) व्यवस्थापनशास्त्र
✓
थोडक्यात · निष्कर्ष

(क) व्यवस्थापनशास्त्र :

पूर्ण उकल

  1. टप्पा १

    प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा स्वतंत्र इतिहास असतो आणि त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा त्या ज्ञानसंचयाच्या स्थितीवर अवलंबून असते. त्यामुळे अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधनपद्धती उपयुक्त ठरते.

  2. टप्पा २

    (अ) विज्ञान :

  3. टप्पा ३
    • वैज्ञानिक शोध आणि सिद्धान्त यांचा कालक्रम आणि त्या शोधांमागील कारणपरंपरेची साखळी समजून घेण्यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
    • ‘गरज ही शोधाची जननी असते.’ अनेकदा वैज्ञानिक शोध मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागतात; त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो.
    • म्हणून शोधांमागील कारणपरंपरा व कालक्रम समजण्यासाठी इतिहासाची संशोधनपद्धती उपयोगी पडते.
  4. टप्पा ४

    (ब) कला :

  5. टप्पा ५
    • विविध कलाक्षेत्रांमधील अभिव्यक्ती आणि त्यामागील वैचारिक-भावनिक-सांस्कृतिक परंपरांच्या आधारे झालेला कलांचा विकास समजून घेणे महत्त्वाचे असते.
    • कोणत्याही कलाविष्काराचे मर्म, कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजू शकतो.
  6. टप्पा ६

    (क) व्यवस्थापनशास्त्र :

  7. निष्कर्ष
    • उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीत त्यासंबंधातील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या हे समजून घेणे आवश्यक असते.
    • या साखळीत गुंतलेल्या विविध स्तरांवरील लोकांची परंपरागत मानसिकता समजून घेण्यासाठी, ज्या सामाजिक व आर्थिक संस्थांच्या संघटनावर ते अवलंबून असतात त्यांचा इतिहास समजला, तर वर्तमानात विविध पातळ्यांवरील व्यवस्थापन करणे सोपे होते.

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.