इतिहासलेखन : भारतीय परंपरा स्वाध्याय ५. (२): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण २
टीपा लिहा.
(२) राष्ट्रवादी इतिहासलेखन
पूर्ण उकल
- निष्कर्ष
- एकोणिसाव्या-विसाव्या शतकात इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनात भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याचा कल दिसतो; त्याला राष्ट्रवादी इतिहासलेखन म्हणतात.
- महाराष्ट्रात याला विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली.
- ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला आणि भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला; असे करताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाच्या चिकित्सापूर्वक छाननीकडे दुर्लक्ष झाले, असा आक्षेपही घेतला जातो.
- म. गो. रानडे, रा. गो. भांडारकर, वि. दा. सावरकर, राजेंद्रलाल मित्र, रमेशचंद्र मजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, वि. का. राजवाडे इत्यादी राष्ट्रवादी इतिहासकार आहेत.
- सावरकरांच्या ‘द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857’ सारख्या लेखनाने स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली; त्याच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहासलेखनालाही चालना मिळाली.
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.