इतिहासलेखन : भारतीय परंपरा स्वाध्याय २. (२): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण २
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(२) बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.
थोडक्यात · निष्कर्ष
मराठ्यांच्या इतिहासाची अशी विविधांगी माहिती मिळत असल्याने बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.
पूर्ण उकल
- टप्पा १
- बखरींमध्ये शूरांच्या पराक्रमाचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढायांची वर्णने आणि थोर व्यक्तींची चरित्रे यांविषयीची माहिती मिळते.
- मराठी भाषेत चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंगवर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक, राजनीतिपर असे बखरींचे अनेक प्रकार आहेत.
- उदा., कृष्णाजी अनंत सभासद यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत लिहिलेल्या ‘सभासद बखरी’तून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती मिळते; ‘भाऊसाहेबांची बखर’ पानिपतच्या लढाईचे वर्णन करते; ‘होळकरांची कैफियत’ होळकर घराण्याची माहिती देते.
- निष्कर्ष
मराठ्यांच्या इतिहासाची अशी विविधांगी माहिती मिळत असल्याने बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.