VedSquare
२. इतिहासलेखन : भारतीय परंपरायादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न ३. (२)पाठ्यपुस्तक पान १४

इतिहासलेखन : भारतीय परंपरा स्वाध्याय ३. (२): उत्तर व उकल

इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण २

प्रश्न
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (२) इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.

पूर्ण उकल

  1. निष्कर्ष
    • इतिहासलेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत.
    • ‘आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे’ याचा त्यांनी पुरस्कार केला.
    • ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या शीर्षकाचे २२ खंड त्यांनी संपादित केले; त्यांतील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत.
    • “इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन; केवळ राजकीय घडामोडी, कटकारस्थाने व युद्धे यांच्याच हकिकती नव्हेत”, असे त्यांचे मत होते; अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.
    • काल, स्थल व व्यक्ती या त्रयीची सांगड म्हणजे ऐतिहासिक प्रसंग, असे त्यांनी मांडले.
    • ग्रँट डफच्या इतिहासलेखनाच्या मर्यादा त्यांनी दाखवून दिल्या.
    • इतिहास संशोधनासाठी त्यांनी ७ जुलै १९१० रोजी पुण्यात ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’ स्थापन केले.

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.