VedSquare
७. महत्त्वमापनयादी उघडा ⌄
प्रकरण ७ · पाठ्यपुस्तक उत्तरे

महत्त्वमापन: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

६७ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १

    शेजारच्या आकृतीत 30 सेमी उंची, 20 सेमी लांबी, व 20 सेमी रुंदीचा तेलाचा डबा आहे. त्यात किती लीटर तेल मावेल ? (1 लीटर = 1000 सेमी³)

    पाठ्यपुस्तक पान १४१ · पूर्ण उकल
  2. २

    बाजूच्या आकृतीत विदूषकाची टोपी आणि टोपीची मापे दाखवली आहे. ती टोपी तयार करण्यासाठी किती कापड लागेल ?

    पाठ्यपुस्तक पान १४१ · पूर्ण उकल
  3. १

    शेजारील आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका वृत्तचितीच्या आत एक गोल आहे. गोल वृत्तचितीच्या तळाला, वरच्या पृष्ठभागाला आणि वक्रपृष्ठाला स्पर्श करतो. वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या r असेल तर गोलाची त्रिज्या आणि वृत्तचितीची त्रिज्या यांचे गुणोत्तर काय आहे ?

    पाठ्यपुस्तक पान १४१ · पूर्ण उकल
  4. २

    शेजारील आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका वृत्तचितीच्या आत एक गोल आहे. गोल वृत्तचितीच्या तळाला, वरच्या पृष्ठभागाला आणि वक्रपृष्ठाला स्पर्श करतो. वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या r असेल तर वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ आणि गोलाचे पृष्ठफळ यांचे गुणोत्तर काय आहे ?

    पाठ्यपुस्तक पान १४१ · पूर्ण उकल
  5. ३

    शेजारील आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका वृत्तचितीच्या आत एक गोल आहे. गोल वृत्तचितीच्या तळाला, वरच्या पृष्ठभागाला आणि वक्रपृष्ठाला स्पर्श करतो. वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या r असेल तर वृत्तचितीचे घनफळ आणि गोलाचे घनफळ यांचे गुणोत्तर काय आहे ?

    पाठ्यपुस्तक पान १४१ · पूर्ण उकल
  6. १

    एका शंकूच्या तळाची त्रिज्या 1.5 सेमी असून त्याची लंब उंची 5 सेमी आहे, तर त्या शंकूचे घनफळ काढा.

    पाठ्यपुस्तक पान १४५ · पूर्ण उकल
  7. २

    6 सेमी व्यास असलेल्या गोलाचे घनफळ काढा.

    पाठ्यपुस्तक पान १४५ · पूर्ण उकल
  8. ३

    एका लंबवृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 5 सेमी व उंची 40 सेमी असेल तर तिचे एकूण पृष्ठफळ काढा.

    पाठ्यपुस्तक पान १४५ · पूर्ण उकल
  9. ४

    एका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल तर त्याचे वक्रपृष्ठफळ काढा.

    पाठ्यपुस्तक पान १४५ · पूर्ण उकल
  10. ५

    धातूच्या एका इष्टिकाचितीची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 44 सेमी, 21 सेमी आणि 12 सेमी आहे. ती वितळवून 24 सेमी उंचीचा शंकू तयार केला. तर शंकूच्या तळाची त्रिज्या काढा.

    पाठ्यपुस्तक पान १४५ · पूर्ण उकल
  11. ६

    आकृती 7.8 व 7.9 मधील भांड्यांची मापे पहा. त्यावरून वृत्तचिती आकाराच्या भांड्यात किती जग भरून पाणी मावेल हे काढा.

    पाठ्यपुस्तक पान १४५ · पूर्ण उकल
  12. ७

    वृत्तचिती व शंकू समान तळाचे आहेत. वृत्तचितीवर शंकू ठेवला. वृत्तचिती भागाची उंची 3 सेमी असून तळाचे क्षेत्रफळ 100 चौसेमी आहे. जर संपूर्ण घनाकृतीचे घनफळ 500 घसेमी असेल तर संपूर्ण घनाकृतीची उंची काढा.

    पाठ्यपुस्तक पान १४५ · पूर्ण उकल
  13. ८

    शेजारील चित्रात दिलेल्या माहितीवरून; अर्धगोल, वृत्तचिती व शंकूपासून तयार झालेल्या खेळण्याचे एकूण पृष्ठफळ काढा.

    पाठ्यपुस्तक पान १४५ · पूर्ण उकल
  14. ९

    आकृती 7.12 मध्ये वृत्तचिती आकाराच्या चपट्या गोळ्यांचे 10 सेमी लांबीचे एक वेष्टन आहे. एका गोळीची त्रिज्या 7 मिमी आणि उंची 5 मिमी असल्यास अशा किती गोळ्या त्या वेष्टनात मावतील ?

    पाठ्यपुस्तक पान १४५ · पूर्ण उकल
  15. १०

    आकृती 7.13 मध्ये मुलांचे एक खेळणे आहे. ते एक अर्धगोल व एक शंकू यांच्या साहाय्याने केले आहे. आकृतीत दर्शविलेल्या मापांवरून खेळण्याचे घनफळ व पृष्ठफळ काढा. (π = 3.14)

    पाठ्यपुस्तक पान १४५ · पूर्ण उकल
  16. ११

    आकृतीत दाखविलेल्या बीच बॉलचे पृष्ठफळ व घनफळ काढा.

    पाठ्यपुस्तक पान १४६ · पूर्ण उकल
  17. १२

    आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका वृत्तचिती आकाराच्या ग्लासमध्ये पाणी आहे व त्यामध्ये एक धातूची 2 सेमी व्यासाची गोळी बुडालेली आहे. तर पाण्याचे घनफळ काढा.

    पाठ्यपुस्तक पान १४६ · पूर्ण उकल
  18. १

    30 सेमी उंची असलेल्या शंकूछेदाच्या आकाराच्या पाण्याच्या बादलीच्या वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या 14 सेमी व 7 सेमी असल्यास बादलीमध्ये किती लीटर पाणी मावेल ? (1 लीटर = 1000 घसेमी)

    पाठ्यपुस्तक पान १४८ · पूर्ण उकल
  19. २. (१)

    शंकूछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या 14 सेमी व 6 सेमी आहेत व त्याची उंची 6 सेमी असल्यास पुढील किमती काढा. (π = 3.14) (1) शंकूछेदाचे वक्रपृष्ठफळ.

    पाठ्यपुस्तक पान १४८ · पूर्ण उकल
  20. २. (२)

    शंकूछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या 14 सेमी व 6 सेमी आहेत व त्याची उंची 6 सेमी असल्यास पुढील किमती काढा. (π = 3.14) (2) शंकूछेदाचे एकूण पृष्ठफळ.

    पाठ्यपुस्तक पान १४८ · पूर्ण उकल
  21. २. (३)

    शंकूछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या 14 सेमी व 6 सेमी आहेत व त्याची उंची 6 सेमी असल्यास पुढील किमती काढा. (π = 3.14) (3) शंकूछेदाचे घनफळ.

    पाठ्यपुस्तक पान १४८ · पूर्ण उकल
  22. ३

    आकृती 7.23 मध्ये एका शंकूछेदाच्या वर्तुळाकार पायांचे परीघ अनुक्रमे 132 सेमी व 88 सेमी आहेत व उंची 24 सेमी आहे. तर शंकूछेदाचे वक्रपृष्ठफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. (π = 22/7)

    पाठ्यपुस्तक पान १४८ · पूर्ण उकल
  23. १

    वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. वर्तुळकंसाचे माप 54° असल्यास त्या कंसाने मर्यादित केलेल्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा. (π = 3.14)

    पाठ्यपुस्तक पान १५४ · पूर्ण उकल
  24. २

    एका वर्तुळकंसाचे माप 80° आणि त्रिज्या 18 सेमी आहे, तर त्या वर्तुळकंसाची लांबी शोधा. (π = 3.14)

    पाठ्यपुस्तक पान १५४ · पूर्ण उकल
  25. ३

    वर्तुळपाकळीची त्रिज्या 3.5 सेमी असून तिच्या वर्तुळकंसाची लांबी 2.2 सेमी आहे, तर वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.

    पाठ्यपुस्तक पान १५४ · पूर्ण उकल
  26. ४

    वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे, त्याच्या एका वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ 100 चौसेमी आहे, तर तिच्या संगत विशाल वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा. (π = 3.14)

    पाठ्यपुस्तक पान १५४ · पूर्ण उकल
  27. ५

    15 सेमी त्रिज्या असलेल्या एका वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ 30 चौसेमी असेल तर संबंधित वर्तुळकंसाची लांबी काढा.

    पाठ्यपुस्तक पान १५४ · पूर्ण उकल
  28. ६. (१)

    शेजारील आकृतीत वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे आणि m(कंस MBN) = 60° तर (1) वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा.

    पाठ्यपुस्तक पान १५४ · पूर्ण उकल
  29. ६. (२)

    शेजारील आकृतीत वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे आणि m(कंस MBN) = 60° तर (2) A(O - MBN) काढा.

    पाठ्यपुस्तक पान १५४ · पूर्ण उकल
  30. ६. (३)

    शेजारील आकृतीत वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे आणि m(कंस MBN) = 60° तर (3) A(O - MCN) काढा.

    पाठ्यपुस्तक पान १५४ · पूर्ण उकल
  31. ७

    3.4 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळपाकळीची परिमिती 12.8 सेमी आहे तर वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.

    पाठ्यपुस्तक पान १५५ · पूर्ण उकल
  32. ८

    आकृतीमध्ये, बिंदू O हे वर्तुळपाकळीचे केंद्र आहे. ∠ROQ = ∠MON = 60°, OR = 7 सेमी, OM = 21 सेमी, तर कंस RXQ व कंस MYN ची लांबी काढा. (π = 22/7)

    पाठ्यपुस्तक पान १५५ · पूर्ण उकल
  33. ९. (१)

    आकृतीत A(P-ABC) = 154 चौसेमी आणि वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असेल, तर (1) ∠APC चे माप काढा.

    पाठ्यपुस्तक पान १५५ · पूर्ण उकल
  34. ९. (२)

    आकृतीत A(P-ABC) = 154 चौसेमी आणि वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असेल, तर (2) कंस ABC ची लांबी काढा.

    पाठ्यपुस्तक पान १५५ · पूर्ण उकल
  35. १०. (१)

    वर्तुळपाकळीची त्रिज्या 7 सेमी आहे. जर वर्तुळपाकळ्यांच्या कंसांची मापे पुढीलप्रमाणे असतील, तर त्या वर्तुळपाकळ्यांची क्षेत्रफळे काढा. (1) 30°

    पाठ्यपुस्तक पान १५५ · पूर्ण उकल
  36. १०. (२)

    वर्तुळपाकळीची त्रिज्या 7 सेमी आहे. जर वर्तुळपाकळ्यांच्या कंसांची मापे पुढीलप्रमाणे असतील, तर त्या वर्तुळपाकळ्यांची क्षेत्रफळे काढा. (2) 210°

    पाठ्यपुस्तक पान १५५ · पूर्ण उकल
  37. १०. (३)

    वर्तुळपाकळीची त्रिज्या 7 सेमी आहे. जर वर्तुळपाकळ्यांच्या कंसांची मापे पुढीलप्रमाणे असतील, तर त्या वर्तुळपाकळ्यांची क्षेत्रफळे काढा. (3) 3 काटकोन

    पाठ्यपुस्तक पान १५५ · पूर्ण उकल
  38. ११

    लघुवर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ 3.85 चौसेमी व संगत केंद्रीय कोनाचे माप 36° असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या काढा.

    पाठ्यपुस्तक पान १५५ · पूर्ण उकल
  39. १२

    आकृतीत □ PQRS हा आयत असून PQ = 14 सेमी, QR = 21 सेमी, तर आकृतीत दाखविलेल्या x, y आणि z या प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ काढा.

    पाठ्यपुस्तक पान १५५ · पूर्ण उकल
  40. १३. (१)

    △ LMN हा समभुज त्रिकोण आहे. LM = 14 सेमी. त्रिकोणाचा प्रत्येक शिरोबिंदू केंद्रबिंदू मानून व 7 सेमी त्रिज्या घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे तीन वर्तुळपाकळ्या काढल्या. त्यावरून, (1) A (△LMN) = ?

    पाठ्यपुस्तक पान १५५ · पूर्ण उकल
  41. १३. (२)

    △ LMN हा समभुज त्रिकोण आहे. LM = 14 सेमी. त्रिकोणाचा प्रत्येक शिरोबिंदू केंद्रबिंदू मानून व 7 सेमी त्रिज्या घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे तीन वर्तुळपाकळ्या काढल्या. त्यावरून, (2) एका वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.

    पाठ्यपुस्तक पान १५५ · पूर्ण उकल
  42. १३. (३)

    △ LMN हा समभुज त्रिकोण आहे. LM = 14 सेमी. त्रिकोणाचा प्रत्येक शिरोबिंदू केंद्रबिंदू मानून व 7 सेमी त्रिज्या घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे तीन वर्तुळपाकळ्या काढल्या. त्यावरून, (3) तीन वर्तुळपाकळ्यांचे एकूण क्षेत्रफळ काढा.

    पाठ्यपुस्तक पान १५५ · पूर्ण उकल
  43. १३. (४)

    △ LMN हा समभुज त्रिकोण आहे. LM = 14 सेमी. त्रिकोणाचा प्रत्येक शिरोबिंदू केंद्रबिंदू मानून व 7 सेमी त्रिज्या घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे तीन वर्तुळपाकळ्या काढल्या. त्यावरून, (4) रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा.

    पाठ्यपुस्तक पान १५५ · पूर्ण उकल
  44. १

    आकृतीमध्ये A केंद्र असलेल्या वर्तुळात ∠ABC = 45°, AC = 7√2 सेमी, तर वर्तुळखंड BXC चे क्षेत्रफळ काढा. (π = 3.14, √2 = 1.41)

    पाठ्यपुस्तक पान १५९ · पूर्ण उकल
  45. २

    आकृती 7.44 मध्ये O हे वर्तुळकेंद्र आहे. m(कंस PQR) = 60°, OP = 10 सेमी, तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. (π = 3.14, √3 = 1.73)

    पाठ्यपुस्तक पान १५९ · पूर्ण उकल
  46. ३

    A केंद्र असलेल्या वर्तुळात ∠PAR = 30° AP = 7.5 तर, वर्तुळखंड PQR चे क्षेत्रफळ काढा. (π = 3.14)

    पाठ्यपुस्तक पान १६० · पूर्ण उकल
  47. ४

    केंद्र O असलेल्या वर्तुळात PQ ही जीवा आहे. ∠POQ = 90°, आणि छायांकित भागाचे क्षेत्रफळ 114 चौसेमी आहे, तर वर्तुळाची त्रिज्या काढा. (π = 3.14)

    पाठ्यपुस्तक पान १६० · पूर्ण उकल
  48. ५

    15 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाची PQ ही जीवा वर्तुळाच्या केंद्राशी 60° चा कोन करते. त्या जीवेमुळे झालेल्या विशालवर्तुळखंड आणि लघुवर्तुळखंड यांची क्षेत्रफळे काढा. (π = 3.14, √3 = 1.73)

    पाठ्यपुस्तक पान १६० · पूर्ण उकल
  49. १. (१)

    खाली दिलेल्या पर्यायांमधून अचूक पर्याय निवडा. (1) जर वर्तुळाचा परीघ व वर्तुळाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर 2:7 असेल तर वर्तुळाचा परीघ किती? (A) 14π (B) 7/π (C) 7π (D) 14/π

    पाठ्यपुस्तक पान १६० · पूर्ण उकल
  50. १. (२)

    खाली दिलेल्या पर्यायांमधून अचूक पर्याय निवडा. (2) 44 सेमी लांबी असलेल्या वर्तुळकंसाचे माप 160° असेल तर त्या वर्तुळाचा परीघ किती? (A) 66 सेमी (B) 44 सेमी (C) 160 सेमी (D) 99 सेमी

    पाठ्यपुस्तक पान १६० · पूर्ण उकल
  51. १. (३)

    खाली दिलेल्या पर्यायांमधून अचूक पर्याय निवडा. (3) कंसाचे माप 90° आणि त्रिज्या 7 सेमी असलेल्या वर्तुळपाकळीची परिमिती काढा. (A) 44 सेमी (B) 25 सेमी (C) 36 सेमी (D) 56 सेमी

    पाठ्यपुस्तक पान १६० · पूर्ण उकल
  52. १. (४)

    खाली दिलेल्या पर्यायांमधून अचूक पर्याय निवडा. (4) तळाची त्रिज्या 7 सेमी व उंची 24 सेमी असलेल्या शंकूचे वक्रपृष्ठफळ किती? (A) 440 सेमी² (B) 550 सेमी² (C) 330 सेमी² (D) 110 सेमी²

    पाठ्यपुस्तक पान १६० · पूर्ण उकल
  53. १. (५)

    खाली दिलेल्या पर्यायांमधून अचूक पर्याय निवडा. (5) 5 सेमी त्रिज्येच्या वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ 440 सेमी² असल्यास त्या वृत्तचितीची उंची किती? (A) 44/π सेमी (B) 22π सेमी (C) 14π सेमी (D) 22/π सेमी

    पाठ्यपुस्तक पान १६० · पूर्ण उकल
  54. १. (६)

    खाली दिलेल्या पर्यायांमधून अचूक पर्याय निवडा. (6) एक शंकू वितळवून त्याच्या तळाच्या त्रिज्येएवढ्याच त्रिज्येची वृत्तचिती तयार केली. जर वृत्तचितीची उंची 5 सेमी असेल तर शंकूची उंची किती? (A) 15 सेमी (B) 10 सेमी (C) 18 सेमी (D) 5 सेमी

    पाठ्यपुस्तक पान १६० · पूर्ण उकल
  55. १. (७)

    खाली दिलेल्या पर्यायांमधून अचूक पर्याय निवडा. (7) 0.01 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती घसेमी? (A) 1 (B) 0.001 (C) 0.0001 (D) 0.000001

    पाठ्यपुस्तक पान १६१ · पूर्ण उकल
  56. १. (८)

    खाली दिलेल्या पर्यायांमधून अचूक पर्याय निवडा. (8) एक घनमीटर घनफळ असलेल्या घनाच्या बाजूची लांबी किती? (A) 1 सेमी (B) 10 सेमी (C) 100 सेमी (D) 1000 सेमी

    पाठ्यपुस्तक पान १६१ · पूर्ण उकल
  57. २

    एका शंकूछेदाच्या आकाराच्या कपडे धुण्याच्या टबची उंची 21 सेमी आहे. टबच्या दोन्ही वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या 20 सेमी व 15 सेमी आहेत. तर टबमध्ये किती लीटर पाणी मावेल ? (π = 22/7)

    पाठ्यपुस्तक पान १६१ · पूर्ण उकल
  58. ३★

    प्लॅस्टिकच्या 1 सेमी त्रिज्येच्या लहान गोळ्या वितळवून वृत्तचिती आकाराची नळी तयार केली. नळीची जाडी 2 सेमी उंची 90 सेमी व बाह्यत्रिज्या 30 सेमी असेल तर त्या नळीसाठी किती गोळ्या वितळवल्या असतील ?

    पाठ्यपुस्तक पान १६१ · पूर्ण उकल
  59. ४

    लांबी 16 सेमी, रुंदी 11 सेमी व उंची 10 सेमी असलेल्या धातूच्या इष्टिकाचितीपासून ज्याची जाडी 2 मिमी आहे व व्यास 2 सेमी आहे अशी काही नाणी तयार केली, तर किती नाणी तयार होतील ?

    पाठ्यपुस्तक पान १६१ · पूर्ण उकल
  60. ५

    एका रोलरचा व्यास 120 सेमी आणि लांबी 84 सेमी आहे. एक मैदान एकदा सपाट करण्यासाठी रोलरचे 200 फेरे पूर्ण होतात. तर 10 रुपये प्रति चौरस मीटर या दराने ते मैदान सपाट करण्याचा एकूण खर्च काढा.

    पाठ्यपुस्तक पान १६१ · पूर्ण उकल
  61. ६

    व्यास 12 सेमी व जाडी 0.01 मीटर असलेला एक धातूचा पोकळ गोल आहे. तर त्या गोलाच्या बाहेरील भागाचे पृष्ठफळ काढा व धातूची घनता 8.88 ग्रॅम प्रति घनसेंटीमीटर असल्यास त्या गोलाचे वस्तुमान काढा.

    पाठ्यपुस्तक पान १६१ · पूर्ण उकल
  62. ७

    एका लंबवृत्तचितीच्या आकाराच्या बादलीचा तळाचा व्यास 28 सेमी व उंची 20 सेमी आहे. ही बादली वाळूने पूर्ण भरली आहे. त्या बादलीतील वाळू जमिनीवर अशा रीतीने ओतली, की वाळूचा शंकू तयार होईल. वाळूच्या शंकूची उंची 14 सेमी असेल तर शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ काढा.

    पाठ्यपुस्तक पान १६१ · पूर्ण उकल
  63. ८

    एका धातूच्या गोळ्याची त्रिज्या 9 सेमी आहे. तो गोल वितळवून 4 मिमी व्यासाची धातूची तार काढली, तर त्या तारेची लांबी किती मीटर असेल ?

    पाठ्यपुस्तक पान १६१ · पूर्ण उकल
  64. ९

    6 सेमी त्रिज्या असलेल्या एका वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ 15π सेमी² आहे, तर त्या पाकळीच्या कंसाचे माप काढा व वर्तुळकंसाची लांबी काढा.

    पाठ्यपुस्तक पान १६१ · पूर्ण उकल
  65. १०

    आकृतीत P हा वर्तुळाचा केंद्र असून रेष AB ही जीवा आहे. PA = 8 सेमी आणि जीवा AB वर्तुळकेंद्रापासून 4 सेमी अंतरावर असेल, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. (π = 3.14, √3 = 1.73)

    पाठ्यपुस्तक पान १६१ · पूर्ण उकल
  66. ११

    वर्तुळपाकळी A-PCQ मध्ये □ ABCD हा चौरस आहे. C - BXD या पाकळीची त्रिज्या 20 सेमी असेल तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी खालील कृती करा.

    पाठ्यपुस्तक पान १६२ · पूर्ण उकल
  67. १२

    O आणि P केंद्रे असलेली वर्तुळे बिंदू A मध्ये आंतून स्पर्श करतात जर, BQ = 9, DE = 5, तर वर्तुळांच्या त्रिज्या शोधण्यासाठी खालील कृती करा.

    पाठ्यपुस्तक पान १६३ · पूर्ण उकल