VedSquare
१. आनुवंशिकता व उत्क्रांतीयादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न ६पाठ्यपुस्तक पान ११

आनुवंशिकता व उत्क्रांती स्वाध्याय ६: उत्तर व उकल

इयत्ता १० वी · विज्ञान भाग २ · प्रकरण १

प्रश्न
अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगांची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत हे लिहा.
✓
थोडक्यात · निष्कर्ष

एखाद्या सजीवात एखादा अवयव काही कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवात तो कार्य करत असतो; म्हणजे दुसऱ्या सजीवासाठी ते अवशेषांग नसते. नाहीसे होत जाणाऱ्या इंद्रियांच्या अशा वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या प्राण्यांत दिसतात; यावरून या सजीवांचे पूर्वज समान असावेत हे सूचित होते.

पूर्ण उकल

  1. टप्पा १
    अवशेषांगे
    सजीवांमधील ऱ्हास पावलेली किंवा अपूर्ण वाढ झालेली निरुपयोगी इंद्रिये अथवा अंगे.
  2. टप्पा २
    • आंत्रपुच्छ : मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त, कार्यक्षम अवयव आहे.
    • कानांचे स्नायू : मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवण्याकरिता उपयुक्त आहेत.
  3. टप्पा ३
    • माकडहाड
    • अक्कलदाढा
    • अंगावरील केस
  4. निष्कर्ष

    एखाद्या सजीवात एखादा अवयव काही कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवात तो कार्य करत असतो; म्हणजे दुसऱ्या सजीवासाठी ते अवशेषांग नसते. नाहीसे होत जाणाऱ्या इंद्रियांच्या अशा वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या प्राण्यांत दिसतात; यावरून या सजीवांचे पूर्वज समान असावेत हे सूचित होते.

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.