आनुवंशिकता व उत्क्रांती स्वाध्याय ४ (अ): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · विज्ञान भाग २ · प्रकरण १
ही ‘मिळवलेली वैशिष्ट्ये’ (Acquired characters) पुढच्या पिढीकडे संक्रमित होतात, असे लॅमार्क मानत; यालाच ‘मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत’ किंवा लॅमार्कवाद म्हणतात. प्रयत्नांमुळे अवयवाचा विकास व न वापरामुळे ऱ्हास होतो हे मान्य झाले; पण स्वतःमध्ये घडवून आणलेले बदल पुढच्या पिढीकडे जात नाहीत, हे वारंवार पडताळल्याने त्यांचे पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले.
पूर्ण उकल
- टप्पा १
जीन बाप्टीस्ट लॅमार्क (1744–1829) या फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञाने असा सिद्धांत मांडला की उत्क्रांती होताना सजीवांच्या शरीररचनेत बदल होतात आणि त्या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न किंवा आळस कारणीभूत असतो. याला ‘इंद्रियांचा वापर व न वापराचा सिद्धांत’ म्हणतात. त्यांच्या मते पिढ्यान्पिढ्या मान ताणून उंच झाडांची पाने खाल्ल्यामुळे जिराफ लांब मानेचे झाले, घणाचे घाव घालून लोहाराचे खांदे बळकट झाले, न वापरल्याने शहामृग व इमू यांचे पंख कमकुवत झाले आणि बिळात जाताना सापाने पाय गमावले.
- निष्कर्ष
ही ‘मिळवलेली वैशिष्ट्ये’ (Acquired characters) पुढच्या पिढीकडे संक्रमित होतात, असे लॅमार्क मानत; यालाच ‘मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत’ किंवा लॅमार्कवाद म्हणतात. प्रयत्नांमुळे अवयवाचा विकास व न वापरामुळे ऱ्हास होतो हे मान्य झाले; पण स्वतःमध्ये घडवून आणलेले बदल पुढच्या पिढीकडे जात नाहीत, हे वारंवार पडताळल्याने त्यांचे पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले.
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.