भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय ५ (३): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण ४
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(3) कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा.
थोडक्यात · निष्कर्ष
या क्षेत्रांमध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत. गुजरातमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, अहमदाबाद ही अशा प्रकारचे प्रशिक्षण देणाऱ्या जगातील अग्रगण्य संस्थांपैकी एक समजली जाते.
पूर्ण उकल
- टप्पा १
कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा आहे. त्या क्षेत्रात संशोधनाच्या आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात :
- टप्पा २
- कलेच्या इतिहासाचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रातही काम करू शकतात.
- कलावस्तूंच्या खरेदी-विक्रीच्या जगात कलावस्तूचे मूल्य ठरवण्यासाठी ती नकली नाही ना हे पारखणाऱ्या, कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.
- सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन, सांस्कृतिक पर्यटन ही नव्याने विकसित होणारी क्षेत्रे आहेत. संग्रहालय आणि अभिलेखागार, ग्रंथालय, माहिती प्रसारणाचे तंत्रज्ञान, पुरातत्त्वीय संशोधन आणि भारतीय विद्या ही काही महत्त्वाची क्षेत्रे आहेत.
- टप्पा ३
उपयोजित कलेच्या क्षेत्रातील संधी :
- टप्पा ४
- औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्र, घराची सजावट, रंगमंचावरील नेपथ्य, चित्रपट व दूरदर्शनवरील कार्यक्रमांसाठी कला दिग्दर्शन.
- प्रकाशन आणि मुद्रण क्षेत्रात पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांची मांडणी, सजावट व सुलेखन, भेटकार्डे, आमंत्रणपत्रिका इत्यादी.
- स्थापत्य आणि छायाचित्रण; संगणकावर तयार केलेली स्थिर व चलत् चित्रे, नक्षी आणि आरेखने.
- दागदागिने, मौल्यवान धातूंच्या कलावस्तू, रंगीत नक्षीची मातीची भांडी, बांबू व वेताच्या वस्तू, काचेच्या कलापूर्ण वस्तू, सुंदर कापड आणि वस्त्रे यांची निर्मिती.
- निष्कर्ष
या क्षेत्रांमध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत. गुजरातमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, अहमदाबाद ही अशा प्रकारचे प्रशिक्षण देणाऱ्या जगातील अग्रगण्य संस्थांपैकी एक समजली जाते.
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.