भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय ५ (१): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण ४
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(1) लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा.
पूर्ण उकल
- निष्कर्ष
- अश्मयुगीन काळातील गुहाचित्रे अनेक देशांमध्ये आढळून येतात. भारतात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये गुहाचित्रे असलेली स्थळे आहेत. मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्रे प्रसिद्ध असून भीमबेटकाचा समावेश जागतिक सांस्कृतिक वारसास्थळांमध्ये करण्यात आला आहे.
- गुहाचित्रांमध्ये मनुष्याकृती, प्राणी आणि काही भौमितिक आकृतींचा समावेश असतो. पुराश्मयुग ते शेतीची सुरुवात होईपर्यंतच्या काळात या चित्रांची शैली व विषय बदलत गेलेले आढळतात; नवीन प्राणी, वनस्पती यांचा समावेश होतो आणि मनुष्याकृतींच्या रेखाटनाच्या पद्धतीत व रंगांमध्येही फरक होत जातो.
- या चित्रांमध्ये काळा, लाल, पांढरा यांसारखे नैसर्गिक द्रव्यांपासून तयार केलेले रंग वापरलेले असतात. त्यावरून त्या काळातील लोकांचे परिसरासंबंधीचे ज्ञान आणि नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करून घेण्याचे तंत्रज्ञान कसे विकसित झाले याची कल्पना येते.
- लोकचित्रकलेची परंपरा गुहाचित्रांच्या परंपरेशी नाते सांगणारी आहे. घरातील लग्नकार्यात, सणासुदीला भिंतींवर चित्रे काढणे, अंगणात रांगोळी काढणे या याच परंपरेच्या अभिव्यक्ती आहेत.
- महाराष्ट्रातील वारली चित्रपरंपरा आणि पिंगुळ किंवा चित्रकथी परंपरा ही लोककला शैलीची निवडक उदाहरणे आहेत. ठाणे जिल्ह्यातील जिव्या सोमा मशे यांनी वारली चित्रकला लोकप्रिय केली; त्यांना २०११ मध्ये पद्मश्री मिळाला.
- चित्रकथी परंपरेत रामायण, महाभारतातील कथा कागदावरील नैसर्गिक रंगांतील ३० ते ५० चित्रांच्या साहाय्याने सांगितल्या जातात. कठपुतळ्या किंवा चित्रांच्या साहाय्याने आख्याने सांगणे यातून प्रादेशिक लोककला परंपरेतील विविध चित्रशैली विकसित झाल्या.
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.