सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय ३. (२): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण १३
खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (२) भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.
पूर्ण उकल
- निष्कर्ष
- ब्रिटिश राजवटीत सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी संघटित होऊ लागले. बारडोली, चंपारण्य, खोतीचा प्रश्न या शेतकऱ्यांच्या चळवळी झाल्या. महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे आणि महात्मा गांधी यांच्या विचारांतून शेतकरी चळवळींना प्रेरणा मिळाली.
- कूळकायदा, कसेल त्याची जमीन यांसारख्या सुधारणांमुळे काही काळ शेतकरी चळवळ संथ राहिली.
- हरितक्रांतीचा फायदा गरीब शेतकऱ्यांना न झाल्याने गरीब व श्रीमंत असे वर्ग निर्माण झाले, असंतोष वाढला आणि शेतकरी चळवळ अधिक क्रियाशील व परिणामकारक झाली.
- शेतमालाला योग्य भाव, शेतीला उद्योगाचा दर्जा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारणे, कर्जमाफी व कर्जमुक्ती आणि राष्ट्रीय शेतीविषयक धोरण या प्रमुख मागण्या आहेत.
- शेतकरी संघटना, भारतीय किसान युनियन, ऑल इंडिया किसान सभा या महत्त्वाच्या शेतकरी संघटना आहेत.
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.