सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय २. (२): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण १३
संकल्पना स्पष्ट करा (२) कामगार चळवळ
पूर्ण उकल
- निष्कर्ष
- भारतातील कामगार चळवळीला औद्योगिकीकरणाची पार्श्वभूमी आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यांसारख्या उद्योगांची सुरुवात झाली.
- १८९९ मध्ये रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप केला. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी १९२० मध्ये ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस’ ही व्यापक संघटना स्थापन झाली.
- स्वातंत्र्योत्तर काळात कामगार चळवळ अधिक प्रभावीपणे काम करू लागली; १९६० आणि ७० च्या दशकात अनेक आंदोलने झाली. १९८० पासून मात्र ती विखुरली गेली.
- जागतिकीकरणाचा परिणाम कामगार चळवळीवर झाला. अस्थिर रोजगार, कंत्राटी कामगार, आर्थिक असुरक्षितता, कामगार कायद्यांचे संरक्षण नसणे, अमर्याद कामाचे तास, कामाच्या ठिकाणची असुरक्षितता व अनारोग्य या आजच्या कामगार चळवळीपुढील समस्या आहेत.
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.