VedSquare
१०. संविधानाची वाटचालयादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न ४. (३)पाठ्यपुस्तक पान ७४

संविधानाची वाटचाल स्वाध्याय ४. (३): उत्तर व उकल

इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण १०

प्रश्न
पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (3) न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे?
✓
थोडक्यात · निष्कर्ष

संविधानातील मूलभूत हक्कांद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी न्यायालयाने अनेक निर्णय दिले आहेत. महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेच्या संदर्भात :

पूर्ण उकल

  1. टप्पा १

    संविधानातील मूलभूत हक्कांद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी न्यायालयाने अनेक निर्णय दिले आहेत. महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेच्या संदर्भात :

  2. टप्पा २
    • न्यायालयाने ज्या महत्त्वाच्या विषयांवर निर्णय दिले, त्यांत महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज हा एक प्रमुख विषय आहे.
    • घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा कायदा आणि त्याच्याशी संबंधित निर्णय हे लोकशाहीकरणाला पोषक असलेले महत्त्वाचे पाऊल आहे. त्याने स्त्रीची प्रतिष्ठा व आत्मसन्मान राखण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
    • पारंपरिक वर्चस्व आणि अधिकारशाहीला नाकारणाऱ्या या निर्णयाने भारतीय लोकशाहीचा आवाका वाढवला आणि त्यातील समावेशन (inclusion) अधिक अर्थपूर्ण केले.
    • मानवी हक्कांची जपणूक आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांविषयीच्या निर्णयांमुळेही महिलांना संरक्षण मिळाले.
  3. निष्कर्ष

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.