संविधानाची वाटचाल स्वाध्याय ४. (२): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण १०
पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (2) सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय?
थोडक्यात · निष्कर्ष
यासाठी समाजात सर्व स्तरांवर प्रयत्न करावे लागतात; त्यात शासनाची धोरणे (उदा., राखीव जागांचे धोरण, अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा) विशेष महत्त्वाची ठरतात.
पूर्ण उकल
- टप्पा १
सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचे उद्दिष्ट आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे :
- टप्पा २
- ज्या ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तींवर अन्याय होतो, तो अन्याय दूर करणे.
- व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो, याचा आग्रह धरणे.
- जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद न करणे.
- सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे.
- निष्कर्ष
यासाठी समाजात सर्व स्तरांवर प्रयत्न करावे लागतात; त्यात शासनाची धोरणे (उदा., राखीव जागांचे धोरण, अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा) विशेष महत्त्वाची ठरतात.
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.