VedSquare
१. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरायादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न ५. (१)पाठ्यपुस्तक पान ६

इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय ५. (१): उत्तर व उकल

इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण १

प्रश्न
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (1) कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.
✓
थोडक्यात · निष्कर्ष

कार्ल मार्क्स यांनी इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो, असे प्रतिपादन केले. त्यांच्या वर्गसिद्धान्ताची मांडणी पुढीलप्रमाणे आहे:

पूर्ण उकल

  1. टप्पा १

    कार्ल मार्क्स यांनी इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो, असे प्रतिपादन केले. त्यांच्या वर्गसिद्धान्ताची मांडणी पुढीलप्रमाणे आहे:

  2. निष्कर्ष
    • माणसांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उत्पादन साधनांची आवश्यकता असते.
    • माणसामाणसांतील नातेसंबंध उत्पादन साधनांचे स्वरूप आणि त्यांची मालकी यांवर अवलंबून असतात.
    • उत्पादन साधने समाजातील सर्व घटकांना समान प्रमाणात उपलब्ध नसतात. त्यामुळे वर्गाधारित विषम विभागणी होते.
    • ज्या वर्गाकडे उत्पादन साधनांचा ताबा असतो, तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो. त्यातून वर्गसंघर्ष निर्माण होतो.
    • मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. मार्क्स यांचा दास कॅपिटल हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.