VedSquare
४. हवामानयादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न ४. (आ)पाठ्यपुस्तक पान ३१

हवामान स्वाध्याय ४. (आ): उत्तर व उकल

इयत्ता १० वी · भूगोल · प्रकरण ४

प्रश्न
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (आ) भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा.
✓
थोडक्यात · निष्कर्ष

हिमालय : हिमालय उत्तरेकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांना अडवतो. तसेच बाष्पयुक्त मोसमी वाऱ्यांना नैसर्गिक अडथळा निर्माण करतो. हे वारे उंच गेल्यावर थंड होऊन प्रतिरोध पाऊस पडतो. हिमालयाच्या रांगांपासून वारे परत फिरतात व मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होतो.

पूर्ण उकल

  1. टप्पा १

    हिंदी महासागर : उन्हाळ्यात भारताच्या मुख्य भूमीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. हिंदी महासागरावरील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून बाष्पयुक्त वारे भारताकडे वाहतात. या नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे भारताला मोठ्या प्रमाणावर पाऊस मिळतो. समुद्राच्या सान्निध्यामुळे किनारी भागात हवामान सम व दमट राहते.

  2. निष्कर्ष

    हिमालय : हिमालय उत्तरेकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांना अडवतो. तसेच बाष्पयुक्त मोसमी वाऱ्यांना नैसर्गिक अडथळा निर्माण करतो. हे वारे उंच गेल्यावर थंड होऊन प्रतिरोध पाऊस पडतो. हिमालयाच्या रांगांपासून वारे परत फिरतात व मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होतो.

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.