VedSquare
३. प्राकृतिक रचना व जलप्रणालीयादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न ३ (उ)पाठ्यपुस्तक पान २३

प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय ३ (उ): उत्तर व उकल

इयत्ता १० वी · भूगोल · प्रकरण ३

प्रश्न
टिपा लिहा. (उ) अजस्र कडा

पूर्ण उकल

  1. निष्कर्ष
    • हा प्राकृतिक भाग क्षेत्रविस्ताराच्या दृष्टीने सर्वांत लहान असला, तरी तेथील उताराचे स्वरूप व त्याचा हवामानावर होणारा परिणाम यांमुळे तो स्वतंत्र विभाग मानला जातो.
    • ब्राझील उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित होते. या भागात उच्चभूमीची उंची ७९० मी इतकी आहे; काही भागांत ती टप्प्याटप्प्याने कमी होते.
    • सावो पावलो ते पोर्तो अॅलेग्रेच्या भागात ही उंची सरळ एकाच उतारात संपते.
    • अजस्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. त्यामुळे अजस्र कड्याच्या पलीकडे (वातविन्मुख प्रदेश) पर्जन्यछायेचा प्रदेश तयार होतो.
    • या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाचे वर्णन ‘अवर्षणाचा चतुष्कोन’ असे केले जाते.

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.