VedSquare
९. सामाजिक आरोग्ययादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न २ (इ)पाठ्यपुस्तक पान १०८

सामाजिक आरोग्य स्वाध्याय २ (इ): उत्तर व उकल

इयत्ता १० वी · विज्ञान भाग २ · प्रकरण ९

प्रश्न
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इ. सायबर गुन्ह्यांच्या घटनांमुळे सामान्य माणसाला कोणकोणत्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते?

पूर्ण उकल

  1. निष्कर्ष
    • बँकेच्या कार्डांचे PIN क्रमांक वापरून खात्यातील पैशांचे परस्पर व्यवहार केले जातात; त्यामुळे आर्थिक नुकसान होते.
    • वेबसाईटवर उत्कृष्ट वस्तू दाखवून प्रत्यक्षात निकृष्ट किंवा बिघाड असलेली वस्तू पाठवून फसवणूक होते.
    • खोट्या फेसबुक अकाउंटद्वारे फसवणूक, विनयभंग व आर्थिक शोषण होते.
    • बदनामीकारक संदेश, अश्लील चित्रे किंवा प्रक्षोभक विधाने पसरवली गेल्याने मानहानी होते.
    • वैयक्तिक माहिती, ई-मेल आय.डी., फोन क्रमांक असंबंधित लोकांपर्यंत पोहोचून नको असलेले व फसवणुकीचे संदेश येतात.
    • व्हायरसमुळे मोबाइल व संगणक यंत्रणा बिघडतात किंवा बंद पडतात.
    • गुन्ह्याचे परिणाम भोगणाऱ्याला मोठ्या मानसिक दडपणाला सामोरे जावे लागते.

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.