राजकीय पक्ष स्वाध्याय ३. (१): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण १२
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) प्रादेशिकता
थोडक्यात · निष्कर्ष
आपली भाषा आणि आपला प्रदेश यांच्याविषयीची आत्मीयतेची भावना निर्माण होऊन काही काळानंतर तिच्याबाबत अस्मिता निर्माण होऊ लागली की त्यातून ‘प्रादेशिकता’ निर्माण होते.
पूर्ण उकल
- टप्पा १
आपली भाषा आणि आपला प्रदेश यांच्याविषयीची आत्मीयतेची भावना निर्माण होऊन काही काळानंतर तिच्याबाबत अस्मिता निर्माण होऊ लागली की त्यातून ‘प्रादेशिकता’ निर्माण होते.
- निष्कर्ष
- लोक आपल्या प्रदेशाच्या हिताचा व विकासाचा प्राधान्याने विचार करू लागतात.
- आपली भाषा, साहित्य, परंपरा, सामाजिक सुधारणांचा इतिहास, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी यांबाबत अभिमान वाटू लागतो व त्यातून भाषिक अस्मिता प्रबळ होते.
- प्रदेशाचा विकास व्हावा, तेथील साधनसामग्री व रोजगाराच्या संधींवर आपला हक्क असावा या भावनेतून प्रादेशिक अस्मिता आकारास येते.
- अशा अस्मिता संघटित झाल्या की प्रादेशिकतेची भावना बळावते; त्यातून कधी राजकीय पक्ष, तर कधी दबाव गट किंवा चळवळी निर्माण होतात. या सर्वांचा हेतू प्रदेशाच्या हितसंबंधांचे जतन करणे हा असतो.
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.