६. प्राण्यांचे वर्गीकरणयादी उघडा ⌄
प्राण्यांचे वर्गीकरण: स्वाध्याय
प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.
स्वाध्याय प्रश्न
- १ (अ)
ओळखा पाहू, मी कोण? अ. मी द्विस्तरीय प्राणी असून मला देहगुहा नाही. मी कोणत्या संघातील प्राणी आहे?
पाठ्यपुस्तक पान ७५ · पूर्ण उकल - १ (आ)
ओळखा पाहू, मी कोण? आ. माझे शरीर अरिय सममिती दाखवते. माझ्या शरीरात (जलसंवहनी) जलाभिसरण संस्था आहे. मी मासा नसतानाही मला मासा संबोधतात. माझे नाव काय?
पाठ्यपुस्तक पान ७५ · पूर्ण उकल - १ (इ)
ओळखा पाहू, मी कोण? इ. मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात कराल?
पाठ्यपुस्तक पान ७५ · पूर्ण उकल - १ (ई)
ओळखा पाहू, मी कोण? ई. मी बहुपेशीय प्राणी असूनसुद्धा माझ्या शरीरात ऊती नाहीत. माझ्या प्राणीसंघाचे नाव सांगा.
पाठ्यपुस्तक पान ७५ · पूर्ण उकल - २
प्रत्येकाची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा. रोहू मासा, नाकतोडा, हत्ती, पेंग्वीन, सुसर, टोड, उडणारा सरडा, हुक वर्म, जेलीफिश, गोम
पाठ्यपुस्तक पान ७५ · पूर्ण उकल - ३
प्राणी वर्गीकरणाच्या पद्धती कशा बदलत गेल्या आहेत ?
पाठ्यपुस्तक पान ७५ · पूर्ण उकल - ४
रचनात्मक संघटन व सममिती यांमध्ये नेमका काय फरक आहे? उदाहरणांसहीत स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान ७५ · पूर्ण उकल - ५ (अ)
थोडक्यात उत्तरे द्या. अ. शार्कचे ‘वर्गापर्यंत’ शास्त्रीय वर्गीकरण लिहा.
पाठ्यपुस्तक पान ७५ · पूर्ण उकल - ५ (आ)
थोडक्यात उत्तरे द्या. आ. कंटकचर्मी संघाचे चार गुणधर्म लिहा.
पाठ्यपुस्तक पान ७५ · पूर्ण उकल - ५ (इ)
थोडक्यात उत्तरे द्या. इ. फुलपाखरू व वटवाघूळ यांतील फरकाचे चार मुद्दे स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान ७५ · पूर्ण उकल - ५ (ई)
थोडक्यात उत्तरे द्या. ई. झुरळ कोणत्या संघातील प्राणी आहे? उत्तर सकारण स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान ७५ · पूर्ण उकल - ६ (अ)
शास्त्रीय कारणे द्या. अ. कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही.
पाठ्यपुस्तक पान ७५ · पूर्ण उकल - ६ (आ)
शास्त्रीय कारणे द्या. आ. जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो.
पाठ्यपुस्तक पान ७५ · पूर्ण उकल - ६ (इ)
शास्त्रीय कारणे द्या. इ. सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू आहेत, पण सर्व समपृष्ठरज्जू प्राणी पृष्ठवंशीय नाहीत.
पाठ्यपुस्तक पान ७५ · पूर्ण उकल - ६ (ई)
शास्त्रीय कारणे द्या. ई. बॅलॅनोग्लॉससला असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांमधील दुवा म्हणतात.
पाठ्यपुस्तक पान ७५ · पूर्ण उकल - ६ (उ)
शास्त्रीय कारणे द्या. उ. सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.
पाठ्यपुस्तक पान ७५ · पूर्ण उकल - ७ (अ)
योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा. अ. रंध्रीय प्राण्यांच्या (स्पाँजेस) शरीरात कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात? 1. कॉलर पेशी 2. निडोब्लास्ट 3. अंतर्जनस्तर पेशी 4. बहिर्जनस्तर पेशी
पाठ्यपुस्तक पान ७५ · पूर्ण उकल - ७ (आ)
योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा. आ. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे शरीर द्विसममिती दाखवते? 1. तारामासा 2. जेलीफिश 3. गांडूळ 4. स्पाँज
पाठ्यपुस्तक पान ७५ · पूर्ण उकल - ७ (इ)
योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा. इ. खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? 1. झुरळ 2. बेडूक 3. चिमणी 4. तारामासा
पाठ्यपुस्तक पान ७५ · पूर्ण उकल - ७ (ई)
योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा. ई. वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो? 1. उभयचर 2. सरीसृप 3. पक्षी 4. सस्तन
पाठ्यपुस्तक पान ७६ · पूर्ण उकल - ८
खालील तक्ता पूर्ण करा. देहगुहा — जननस्तर — संघ: नसते — रिकामी जागा — रंध्रीय प्राणीसंघ; नसते — त्रिस्तर — रिकामी जागा; आभासी — रिकामी जागा — गोलकृमींचा संघ; असते — रिकामी जागा — संधिपाद प्राणीसंघ.
पाठ्यपुस्तक पान ७६ · पूर्ण उकल - ९
तक्ता पूर्ण करा. प्रकार — वैशिष्ट्ये — उदाहरणे: चक्रमुखी — रिकामी जागा — रिकामी जागा; रिकामी जागा — कल्ल्याद्वारे श्वसन — रिकामी जागा; उभयचर — रिकामी जागा — रिकामी जागा; रिकामी जागा — रिकामी जागा — देवमासा; रिकामी जागा — शीतरक्ती — रिकामी जागा.
पाठ्यपुस्तक पान ७६ · पूर्ण उकल - १०
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा. हायड्रा, जेलीफिश, प्लॅनेरीया, गोलकृमी, फुलपाखरू, गांडूळ, ऑक्टोपस, तारामासा, शार्क, बेडूक, पाल, कबुतर.
पाठ्यपुस्तक पान ७६ · पूर्ण उकल - ११
आकृतीस योग्य नावे द्या.
पाठ्यपुस्तक पान ७६ · पूर्ण उकल