VedSquare
सराव थांबवा
महत्त्वाचे प्रश्नइतिहास व राज्यशास्त्र · ऐतिहासिक ठेव्यांचे जतन · Q4
४ पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न १४ गुणजगातील प्राचीन ग्रंथालये

?????? १

तुमचे उत्तर
४ गुण
पुढील उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा. तमिळनाडूच्या सहलीत विद्यार्थ्यांनी तंजावर येथील 'सरस्वती महाल ग्रंथालया'ला भेट दिली. मार्गदर्शकांनी सांगितले की हे ग्रंथालय इसवी सनाच्या सोळाव्या-सतराव्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेले. इसवी सन 1675 मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावर जिंकून घेतले आणि स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. व्यंकोजीराजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले; त्यामध्ये सरफोजीराजे भोसले यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या सन्मानार्थ इसवी सन 1918 मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले. या ग्रंथालयाच्या संग्रहात सुमारे एकोणपन्नास हजार ग्रंथ आहेत. विद्यार्थ्यांना तक्षशिला येथील ग्रंथालय, मेसोपोटेमियातील असिरियन सम्राट असुरबानीपाल याचे ग्रंथालय आणि अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय यांचीही आठवण झाली.
१ गुण
तंजावर कोणी व केव्हा जिंकून घेतले?
१ गुण
ग्रंथालयाला कोणाचे नाव देण्यात आले?
२ गुण
अशा जुन्या ग्रंथालयांतील दुर्मीळ ग्रंथ पुढील पिढ्यांसाठी टिकवण्यासाठी आधुनिक काळात कोणते उपाय करता येतील?

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

४ प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.