४ गुणपुढील उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा. 9 ऑगस्ट 2017 रोजी 1942 च्या 'चले जाव' आंदोलनाला 75 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त एका शाळेच्या विद्यार्थ्यांनी आकाशवाणी केंद्राला भेट दिली. तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले की 15 ऑगस्ट 1947 किंवा त्यानंतरच्या प्रधानमंत्र्यांची स्वातंत्र्य दिनानिमित्तची भाषणे आकाशवाणीच्या संग्रहात आहेत आणि त्यांचा समकालीन परिस्थिती समजण्यासाठी उपयोग होतो. राष्ट्रीय नेत्यांची जयंती वा पुण्यतिथी किंवा एखाद्या ऐतिहासिक घटनेस 25, 50, 100 वर्षे पूर्ण होत असतील तर त्याची चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती लागते; अशा वेळी आकाशवाणीला इतिहासाच्या अभ्यासकांची गरज लागते. आकाशवाणीवरही दिनविशेष कार्यक्रम प्रसारित होतो. विद्यार्थ्यांनी 1942 च्या चळवळीत भूमिगत रेडिओ केंद्रांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल प्रश्न विचारले.१ गुण'चले जाव' आंदोलनाला 75 वर्षे कोणत्या वर्षी पूर्ण झाली?तुमचे उत्तर१ गुणआकाशवाणीच्या संग्रहातील स्वातंत्र्य दिनाच्या भाषणांचा उपयोग कशासाठी होतो?तुमचे उत्तर२ गुणतुम्हांला आकाशवाणीसाठी एखाद्या ऐतिहासिक दिनविशेषावर कार्यक्रम तयार करायचा आहे. तो अचूक व रंजक होण्यासाठी तुम्ही काय कराल?तुमचे उत्तर