४ गुणपुढील उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा. शाळेच्या कला प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील वारली चित्रपरंपरेवर प्रकल्प केला. त्यांना कळले की वारली चित्रपरंपरा आणि पिंगुळ किंवा चित्रकथी परंपरा ही लोककला शैलीची निवडक उदाहरणे आहेत. ठाणे जिल्ह्यातील जिव्या सोम्या मशे यांचा वारली चित्रकला लोकप्रिय करण्यात फार मोठा वाटा आहे; त्यांच्या वारली चित्रांसाठी त्यांना भारतीय आणि जागतिक स्तरावरचे अनेक पुरस्कार मिळाले आणि सन 2011 मध्ये त्यांना पद्मश्री हा बहुमान मिळाला. लोकचित्रकलेची परंपरा गुहाचित्रांच्या परंपरेशी नाते सांगणारी आहे. घरातील लग्नकार्यात, सणासुदीला भिंतींवर चित्रे काढणे, अंगणात रांगोळी काढणे यांतून प्रादेशिक लोककला परंपरेतील विविध चित्रशैली विकसित झाल्या. प्रकल्पाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी वारली नक्षीची भेटकार्डे बनवून विक्रीला ठेवली.१ गुणवारली चित्रकला लोकप्रिय करण्यात मोठा वाटा असलेल्या कलाकाराचे नाव लिहा.तुमचे उत्तर१ गुणलोकचित्रकलेची परंपरा कोणत्या परंपरेशी नाते सांगते?तुमचे उत्तर२ गुणविद्यार्थ्यांनी वारली नक्षीची भेटकार्डे बनवणे हे उपयोजित कलेचे उदाहरण कसे ठरते? अशा कलांमुळे कोणत्या व्यावसायिक संधी निर्माण होतात?तुमचे उत्तर